आलेगाव येथे खासदार मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार...

*मतदानरूपी आर्शीवाद देऊन माढा मतदारसंघातील जनतेने आमदार केलं; त्याचं विश्वासाने जनतेची सेवा करणार* - आमदार अभिजीत पाटील

पंढरपूर प्रतिनिधी/-
माढा मतदारसंघातील लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे त्याच विश्वासाने जनतेचे प्रत्येक काम करण्यासाठी जबाबदारी आमची असून रस्ते, वाहतूक, पिण्याचे पाणी, आरोग्यविषयक सुविधा, एमआयडीसी माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध, वीज पुरवठा व इतर बाबींसह युवक, महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यमान कसे सुधरेल यासाठी सर्वसामान्य प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

आलेगाव बुद्रुक तालुका माढा येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत आबा पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख,भारत पाटील, रावसाहेब देशमुख, बाळासाहेब ढेकणे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डीव्हीपी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक, उपसरपंच रामचंद्र पवळ, शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक गोविंद पवार, शिवसेनेचे अध्यक्ष मधुकर देशमुख, नानासाहेब ढवळे, सुरेश पाटील, अनिल पाटील, भारत माने, रामकृष्ण काळे, संतोष ढवळे, भाऊसाहेब काळे, पंढरीनाथ चंदनकर, गोरख देशमुख, आबासाहेब वाघ, अरुण गाडे, सतीश केचे, महेंद्र पाटील, दादासाहेब कळसाईत, हरिभाऊ माने ,भारत माने, अनिल महाडिक, रावसाहेब ताठे, सतीश हेगडकर, प्रशांत पाटील, श्रीमंत केचे, लखन काळे, सुलतान शेख, शंकर सुरवसे, सतीश काळे, अशोक केचे, विकी भोसले, प्रताप पिसाळ, हनुमंत शेलार, बाळासाहेब शिरतोडे, दत्तात्रय बंडलकर, अध्यक्ष विनायक पाटील, बंडू चंदनकर, समाधान कवडे, माजी सरपंच समाधान पाटील, अभिजीत कवडे, ज्ञानदेव चंदनकर, रामचंद्र चंदनकर, किरण जाधव, अजय भोसले, बळीराम केचे, आप्पासाहेब यादव, अण्णासाहेब माने, जहागीर शेख, विकी भोसले, दीपक लांडगे, भास्कर गुरगुडे उपस्थित होते.

यावेळी आमदार अभिजीत पाटील म्हणाले की; माढा मतदारसंघातील मायबाप जनतेने मतदान रोपे आशीर्वाद देऊन तीस वर्षाची सत्ता उलथून विकासकामे करणाऱ्याला संधी दिली त्यांच्या या प्रेमातून कधीच उतराई होणार नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कटिबद्ध असून उजनी धरणाच्या पाण्याची नियोजन, भीमा नदीची आवर्तने, कोंढार भागातील बंधाऱ्याचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर येथे उड्डाणपूल आरोग्य विषयक उपचारासाठी निधीसह अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form