### **आषाढी वारी 2025 तयारीसाठी कर्मचारी वर्गाला सूचना व मार्गदर्शन**
**पंढरपूर, दि. 12 जून 2025**
आषाढी वारी 2025 च्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत सर्व विभागातील कर्मचारी वर्गास विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित दर्शन मिळावे या उद्देशाने कार्य विभागनिहाय जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या.
या प्रसंगी कार्यकारी अधिकारी **श्री राजेंद्र शेळके**, व्यवस्थापक **श्री मनोज श्रोत्री** आणि लेखाधिकारी **श्री मुकेश अनेचा** यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आपापल्या कामाचे स्वरूप, कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कार्यवाही करता यावी याकरिता **शहर पोलीस निरीक्षक श्री घोडके सर** यांच्या उपस्थितीत **आपत्कालीन उपाययोजना, गर्दी नियंत्रण आणि सामन्वय व्यवस्थापन** याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.
यामध्ये समितीच्या सर्व विभागप्रमुखांनी , कर्मचारी यांनी सहभाग घेतला असून, यंदाची वारी अधिक सुयोग्य व सुरक्षित करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाहीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Tags
सामाजिक वार्ता