आंबे,ता.पंढरपुर येथे श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
पंढरपूर प्रतिनिधी--
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, यासाठी महाविद्यालयांनी श्रमसंस्कार शिबिरे घेणे महत्त्वाचे आहे. अशा शिबिरातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार तर होतातच शिवाय त्यांच्यामध्ये सामाजिक भावना देखील निर्माण होते. श्रमसंस्कार शिबिर डिजिटल युगात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक संस्कार आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. आंबे (ता. पंढरपूर) येथील श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
चळे (ता. पंढरपूर) येथील श्रीकृष्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंबे येथे श्रमसंस्कार शिबिर पार पडले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहा दिवस शिबिरात निवासी सहभाग घेतला होता. शिबिराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून गावात स्वच्छता मोहीम राबवली. या निमित्ताने विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर विचारमंथन ही झाले.माजीआमदार सावंत पुढे म्हणाले,विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती प्रचंड आहे.परंतु त्यांच्या या शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केले जाते. शिबिरातून केवळ सामाजिक प्रबोधन केले जात नाही तर त्यांच्यावर सामाजिक संस्कार देखील केले जातात.
आंबे (ता. पंढरपूर) येथील श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दत्तात्रय सावंत, श्रीमती.प्राजक्ता सावंत
सरपंच ग्रामपंचायत आंबे ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
संजय मुजमुले ,विभागीय समन्वयक, रा. सो.यो. पु.अ. हो. सो. वि. सो.प्र.प्राचार्य बाबर एन. ए.श्रीकृष्ण महाविद्यालय, चळे ,डॉ. शशिकांत तांबे प्राचार्य, बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चळे
आण्णा मामा शिंदे NSS कार्यक्रमाधिकारी
सौ. एडके पी. एम.श्रीकृष्ण महाविद्यालय, चळे
NSS विभाग प्रमुख डॉ. होनकळस एम. एन.
बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चळे
तसेच दांडगे जी.पी. सर आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता