माळशिरस तालुका जि. प. सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. चेअरमनपदी बाळासाहेब शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब भोसले....

माळशिरस प्रतिनिधी--- 
माळशिरस तालुका जि. प. सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित माळशिरस या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती.  दिनांक 25 फेब्रुवारी, 2025 रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची सभा अध्यासी अधिकारी श्री. बंडगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या माळशिरस येथील कार्यालयात पार पडली.  सदरची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीने पार पडली असून स्पष्ट बहुमताने पंचायत समिती माळशिरसचे (अर्थ विभाग) लेखाधिकारी बाळासाहेब विजय शिंदे यांची चेअरमन पदी व ग्राम पंचायत अधिकारी बाळासाहेब आण्णा भोसले यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली.  

सदर निवडीनंतर संस्थेचे संचालक ग्राम पंचायत अधिकारी  सचिन बनकर भाऊसाहेब, कनिष्ठ सहाय्यक तथा नवनिर्वाचित संचालक धन्यकुमार काळे साहेब यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक प्रभारी उप अभियंता श्री. आर. एस. रणनवरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी श्री. बंडगर साहेब यांचा सत्कार केला.  तसेच मावळते चेअरमन रवींद्र पवार यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तदनंतर उपस्थित संचालकांचा नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
          
संस्थेची संचालक मंडळ बिनविरोध करण्यासाठी विविध  कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले त्याही पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.  सदर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या प्रक्रियेवेळी नवनिर्वाचित सर्वच संचालक उपस्थित होते.
       
निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांच्या वतीने सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.  सदर वेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक  धन्यकुमार काळे, ग्राम पंचायत अधिकारी  दिपक गोरे, ग्रामसेवक संघटना DNA 136 चे माळशिरस तालुका अध्यक्ष विजयसिंह माने देशमुख ग्राम पंचायत अधिकारी पानसरे भाऊसाहेब, ग्राम पंचायत अधिकारी  पी एम एकतपुरे, ग्राम पंचायत अधिकारी,  ए वाय होळ,  आडगळे भाऊसाहेब, विविध संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.  निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी  बंडगर साहेब व त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव  राजेंद्र मिसाळ यांनी काम पाहिले. तसेच सदर निवडणूक कामकाजात त्यांना  बापू माने, शिपाई यांनी सहाय्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form