सोलापूर प्रतिनिधी --
एकमुखी दत्त मंदिर श्रीक्षेत्र नारायणपूर, ता. पुरंदर, जि. पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त तिनदिवसीय भव्य सोहळाचे प.पू.श्री श्री श्री सद्गुरु नारायण महाराज (आण्णा) यांच्या कृपाआशिर्वादाने व प. पू. श्री. टेंबे स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे १३ डिसेंबर, शुक्रवार रोजी यज्ञकुंड दुपारी १२.०५ व आजोळ हिवरे ज्योत स्वागत,सायंकाळी ४ते ६२०० कोटी शिव-दत्त नामयज्ञ अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंड २४वा वर्धापन दिन,रात्री ८.३० वा. श्री दत्त मंदीरात आरती होईल.शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळा रोजी दुपारी २ वाजल्यापासुन येणाऱ्या सर्व दिंड्यांचे भव्य स्वागत.सायंकाळी ७.०३ वाजता श्री दत्तजन्म सोहळा.सुंठवडा व महाप्रसाद,रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजीश्री दत्त जयंती सोहळापहाटे ४ ते ६ रुद्र
अभिषेक सकाळी ९ वा.श्री दत्तमहाराजांची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा होईल,दुपारी १.३० वा. प्रवचन,आरती व महाप्रसाद असा भरगच्च तिन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे दत्त सेवेकरी मंडळ, श्री क्षेत्र नारायणपूर येथिल आयोजक मंडळींनी दिली आहे तसेच सर्व गुरुबंधू, भाविक भक्तांनी या अध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
Tags
धार्मिक वार्ता