पंढरपूरात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा...ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांचे कवच -- तहसीलदार सचिन लंगोटे


पंढरपूर प्रतिनिधी--
ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकाचे कवच असून ग्राहकांनी या कायदाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त तहसील कार्यालय व ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

२६ डिसेंबर हा राज्यभर ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहक दिनाचे अवचित साधुन सदर कार्यक्रम तहसील कार्यालय पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा हा नागरिकांसाठी, ग्राहकांसाठी करण्यात आला आहे.या कायद्यामुळे प्रत्येकाला आधार मिळाला असून यासाठी नागरिकांनी सजग राहिले पाहिजे असे ते म्हणाले.आज समाजामध्ये ग्राहक पंचायती सारखी संघटना काम करते आहे त्यांच्या माध्यमातून अनेक ग्राहकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत असे ते अध्यक्षीय भाषणातून संवाद साधताना तहसीलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले.
   
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार लंगोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार देशपांडे हे होते.प्रारंभी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार लंगोटे यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले.

ग्राहक व नागरिक यांनी एखादी वस्तू खरेदी करताना पावतीचा आग्रह धरला पाहिजे कारण पावती शिवाय कुठलीही तक्रार चालत नाही ज्या ठिकाणी पैसे घेऊन व्यवहार केला जातो त्या सर्वांना ग्राहक संरक्षण कायद्या
नुसार पावती देणे बंधनकारक आहे आणि पावती घेणे हा नागरिकांचा हक्क आहे.
याकरता नागरिकांनी जागरूक राहून पावतीच्या आग्रह धरला पाहिजे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी सांगितले.
 
प्रारंभी ग्राहक दिनानिमित्त प्रास्ताविक व सूत्रसंचालन आझाद अल्लापुरकर यांनी केले. या कार्यक्रमास ग्राहक पंचायत सदस्य सतीश निपाणकर, सागर कारंडे, विभुते विभागाचे अधिकारी कुंभार,तसेच सचिन देठे, सागर शिंदे,सुरज सरवदे, तसेच  तहसील कार्यालयातील विविध खात्याचे कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form