विठ्ठलाचे दर्शन होणार सुलभ व वेळेत...

पंढरपूर प्रतिनिधी--
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी
येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांचे सुलभ, वेळेत व सुखकर दर्शन व्हावे यासाठी तिरूपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकण दर्शन पध्दती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टिसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर सदर कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजुर केला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. बैठकीस मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व मंदीर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form