सोलापूर प्रतिनिधी --
पांचाल सोनार गौरव समिती तथा सोनार समाज संघटना आणि पांचाल सोनार संस्था सोलापूर यांच्या वतीने सोनार समाजातील विज्ञान आणि तंत्र ज्ञानाधीन विविध क्षेत्रात वैयक्तिक रित्या केलेल्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य आणि सामाजिक योगदाना
बद्दल समाजातील सुवर्णरत्न अभियंत्याना राज्यस्तरीय विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
दिनांक रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी सोलापूर शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय वधू वर मेळाव्यात राज्यस्तरीय विज्ञान रत्न
पुरस्काराचे मानकरी सर्वश्री जितेंद्र रामचंद्र दीक्षित,अथर्व अमर दीक्षित,अथर्व अवधूत महामुनी,विनायक सूर्यकांत पंडित,कु.रुपाली रुद्रप्पा दोडमनी यांना राज्यस्तरीय विज्ञान
रत्न पुरस्कार प्रदान समाजातील अतिविशिष्ठ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे अशी माहिती वसंत पोतदार यांनी दिली.
Tags
सामाजिक वार्ता