पंढरपूर प्रतिनिधी --
सोलापूर जिल्ह्यावर साहेबांचे विषेश प्रेम आहे.त्यामुळे साहेबांनी मला मंगळवेढा तालुक्यातील सभेस जाण्याचे आदेश दिले आहे. मी मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा,रोजगार निर्मितीचा, शेतीविषयक विविध प्रश्न व महिलांसाठी सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना याबाबत मी स्वतः लक्ष घालून हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्द सुप्रिया सुळे यांनी दिला.ते महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राहुल शहा,माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, काँग्रेसचे फिरोज मुलाणी,माजी उपनगराध्यक्ष मुजफर काझी,माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,जेष्ठ नेते दादासाहेब गरंडे, राजाभाऊ चेळेकर, महिला नेत्या संगीता कट्टे, यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की,अनिल सावंत हे आधाराची सावली म्हणून तुमच्या सोबत कायम उभे राहणार आहेत. मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मला पवार साहेबांनी अनिल सावंत यांच्यासाठी पाठवले आहे.मी विठ्ठलाची भक्त आहे.ही संतांची भूमी आहे. अनिल सावंत माळकरी आहेत यांचा पारदर्शक कारभार आहे.त्यामुळे अशा उमदा उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे.हा देश कुणाच्या मर्जीने चालत नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधान, घटनेवर चालत आहे. महाविकास सरकार सत्तेवर आल्यावर महागाई वाढू देणार नसून महिलांसाठी अनेक योजना राबवणार आहे. लोकसभेला जसा दणका दिला. त्याप्रमाणे विधानसभेला दणका देऊन अनिल सावंत यांना निवडुन द्या.
मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मला पवार साहेबांनी अनिल सावंत यांच्यासाठी पाठवले आहे.
याप्रसंगी सभेस बोलताना अनिल सावंत म्हणाले की मला फक्त विकास करायचा आहे या मतदारसंघाचा शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची भूमिका पार पाडली असून वेळेवर बिल दिले आहे.गेली 50 वर्ष पाण्यावरून राजकारण करून खोटी
आश्वासने देऊन निवडून आले
आहेत.शेतकऱ्यांना हातभार देण्यासाठी नवीन उद्योग सुरू करत आहे.येणाऱ्या काळात तरुणांच्या शिक्षणासाठी मोठे शैक्षणिक संकुल सुरू करणार आहे. बचत गटातील महिलांना घरगुती काम मिळवून देणार आहे.संत भुमी मंगळवेढा येथे संत बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाचा विषय आजपर्यंत नुसता कागदोपत्री रेंगाळला आहे.एक ही ठोस काम मार्गी लागले नसल्याचा आरोप अनिल सावंत यांनी केला.गेल्या काही वर्षाच्या काळात कोणतेच ठोस काम केले नाही.असा घणाघात त्यांनी केला.या सभेत उपस्थित जनसमुदायास मतदान रुपी आशिर्वाद देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
Tags
राजकीय वार्ता