दिलीप धोत्रे यांना पाठिंबा देत पंढरपुरातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश...


पंढरपूर प्रतिनिधी-- 
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचाराची मनसेची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.ते पंढरपूर शहरातील विविध भागात जनतेशी संवाद साधत प्रचाराचा धडाका लावला आहे.पंढरपूर शहरातील विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, नेते पदाधिकारी त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
या निवडणुकीत मंगळवेढा आणि पंढरपूरातील जनतेचा कौल सर्वसामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे. सर्व पक्षांकडून देण्यात आलेल्या उमेदवारांच्या कामाची तुलना मतदारसंघातील नागरिकांकडून केली जात आहे.यामध्ये मंगळवेढा आणि पंढरपूरात मनसेला विविध राजकीय आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने त्यांना कौल मिळणार असल्याचे शक्यता वर्तवली जात असून सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या दिलीप
धोत्रे यांच्या नावाला पहिली पसंती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाने ग्रासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकयांच्या शेतमालाला योग्य भाय मिळवून देण्यासाठी कायम जनतेच्या संपर्कात असलेले दिलीप बापू धोत्रे यांना मंगळवेढा व पंढरपूरातील नागरिकांचा कौल मनसेला मिळणार असून सामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्या दिलीप धोत्रे यांच्या नावाला येथील नागरिकांची प्रथम पसंती असल्याचे राजकीय जानकारातून बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form