मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविले -- आमदार समाधान आवताडे

पंढरपूर प्रतिनिधी --
महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे आज मंगळवेढा गावभेट दौऱ्यात त्यांनी मतदारांशी संवाद साधताना महायुतीच्या सरकार माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविले आहे तसेच 
महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकास कामांची माहिती दिली तसेच गावासाठी मंजूर असलेल्या प्रस्तावित विकास कामांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
पोटनिवडणुकीत आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या भक्कम विश्वास ठेवून मला विजयी केले तसेच यावेळी सुध्दा आपण मला भरभरुन मतदान रुपी आशिर्वाद देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.  

याप्रसंगी महायुतीचे घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी,सहकारी मित्र परिवार  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form