श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन

पंढरपूर प्रतिनिधी-- 
श्रीस्वामी समर्थ शिक्षण प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 2025 चा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा जानेवारी 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे असल्याची आयोजिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार समाजातील कला, क्रीडा ,सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक ,शैक्षणिक ,उद्योग, व्यवसाय,संगीत ,आरोग्य, साहित्यिक, पत्रकार, देशसेवा, प्रशासकीय सेवा इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लोकांना या प्रतिष्ठानच्या वतीने मानाचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे.

सदर पुरस्काराचे  स्वरूप श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा असलेली ट्रॉफी,पदक,शाल, सपत्नीक सत्कार करण्यात येतो. जेणेकरून पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी त्यांनी सुरू केलेले काम अखंड, प्रशंसनीय राहावे ही समाजाची व प्रतिष्ठानची अपेक्षा आहे. पुरस्कार हा संबंधित व्यक्तीच्या त्या क्षेत्रातील कामाच्या मूल्यमापन तपासणी नुसार गठीत केलेल्या निवड समितीमार्फत निवड केली  जाते. 

यासाठी यात सहभाग घेणाऱ्या उल्लेखित काम करणाऱ्या उमेदवारांनी 20 डिसेंबर 2024 पर्यंत आपला प्रस्ताव निवड समितीचे प्रमुख शसंतोष गायकवाड  यांच्याकडे कुरियर अथवा पोस्टाद्वारे 
पोहोच देय पद्धतीने पाठवावा. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.तरी पुरस्काराची निवड त्यांच्या कामाचा लेखाजोखा व आतापर्यंत मिळालेली प्रसिद्धी यावर राहते. पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचा पत्ता श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान, लिंक रोड ,कर्मयोगी नगर, प्लॉट नंबर 58 ,शिवयोगी मंगल कार्यालय, पेट्रोल पंपा शेजारी पंढरपूर. तसेच समक्ष प्रस्ताव सादर करण्याचे ठिकाण प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज प्रशांतराव परिचारक नगर ,पंढरपूर. वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5. संपर्क 96 99 31 04 68

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form