जेष्ठ पत्रकार श्रीनिवास कदम पाटील यांची केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीवर पुनश्च निवड

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस,मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,मा.आमदार राम सातपुते यांच्यामुळे संधी मिळाली आहे.

माळीनगर दि.२९ (प्रतिनिधी)
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस,कार्यतत्पर पाणीदार मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर,माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्यामुळे बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या पुनश्च सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे.मुंबई महाप्रबंधक कार्यालयातील उपमहाप्रबंधक तथा सचिव क्षेत्रीय रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीचे सचिव कुश किशोर मिश्र यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
       श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील मळोली गावातून त्यांनी गेल्या १५ वर्षापासून ग्रामीण भागामध्ये पत्रकारितेला सुरुवात करून समाजामधील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी प्रसारमाध्यमातून मांडून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केलेले आहे.बारामती झटका वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी ७५ लाखावर गेलेली आहे तर बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची एक कोटी १७ लाख संख्या झालेली आहे.प्रशासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न कायम केलेला आहे.इंग्रज कालीन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न रखडलेला होता. केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटावा यासाठी वार्तांकन केलेले होते.सोशल मीडियाच्या समाज माध्यमातून केंद्र व राज्य सरकारपर्यंत रेल्वे मार्ग झाल्यानंतर अखंड हिंदुस्तानच्या वैष्णवांचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी भाविक भक्तांची सोय होऊन सातारा,सोलापूर जिल्ह्यातील दळणवळणाचा प्रश्न मिटून उद्योग व्यवसाय व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला वाहतूक करण्या करिता सुख सुविधा उपलब्ध होणार आहेत.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा,इतर ठिकाणी शाळेला ये जा करता यावी असे अनेक मुद्दे घेऊन इंग्रजकालीन रखडलेली रेल्वे पूर्ण होण्याकरता सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस,कार्यतत्पर पाणीदार मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांचे रेल्वे सुरू करण्याविषयीची तळमळ प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले असल्याने बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांची सल्लागार समितीवर पुनश्च काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होऊ लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form