*अखेर जय वीरूची जोडी फुटणार?*
सांगोला प्रतिनिधी-- (रविराज शेटे)
माजी आमदार, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सहकारी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी नुकताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्री येथे जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला असून, शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे अखेर जय वीरूची जोडी फुटणार असे बोलले जात आहे.
दीपक आबा साळुंखे पाटील यांनी परवाच पत्रकार परिषदेत आपली उमेदवारी फिक्स असल्याचे घोषित केले होते परंतु त्यावेळी अपक्ष राहणार परंतु निवडणूक ही लढवणारच व जर कोणत्या पक्षाने बोलावले तर विचार करू असे सांगितले होते, अखेर त्यांनी मुंबई गाठली व ठाकरे गटात प्रवेश केला, त्यामुळे अखेर जय वीरूची जोडी फुटणार हे निश्चित झाले आहे व शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध शेकाप असा तिरंगी सामना होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. व त्यांची उमेदवारी फिक्स झाली आहे. व मशाल सांगोला तालुक्यात पेटणार असे कार्यकर्त्यात बोलले जात आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आबांना प्रवेश दिला यावेळी यश राजे साळुंखे पाटील, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे, डॉक्टर पियुष दादा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. आबा जोमाने कामाला सुरुवात करा व तुमच्या हातात मशाल दिली आहे याचा अर्थ समजून घेऊन, ही मशाल शिवसेनाप्रमुखांची असून घराघरात पोहोचवा असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.