पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा काँग्रेस पक्षालाच मिळावी--आदित्य फत्तेपूरकर

सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शिवाजीराव काळगे यांना निवेदनाद्वारे केली मागणी...

पंढरपूर प्रतिनिधी--
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजत आहे. अशातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी वर्षानुवर्षे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यालाच मिळावी. यासाठीची मागणी काँग्रेसकडील पाच इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नाही. मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्य मतदार संघातून मिळाले. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला येणाऱ्या विधानसभेत सहज सोपी आहे. असे असताना येणाऱ्या निवडणुकीत केवळ वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी. इतर कोणालाही उमेदवारी पक्षाने देऊ नये. अशी मागणी आता जोर धरत आहे.

काँग्रेस पक्षाकडे आदित्य फत्तेपुरकर, रविकिरण कोळेकर , अमोल म्हमाणे, अशोक चेळेकर आणि राजेश लिगाडे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या पाचही उमेदवारांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शिवाजीराव काळगे आणि जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारीची मागणी केली. यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोईन शेख , चेतन नरोटे , सूनंजय पवार, अमर सुर्यवंशी , महेश अधटराव, राजेंद्र महाराज मोरे उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या काँग्रेस पक्षांमध्ये येऊन निवडणूक लढवण्यासाठी आलेख नेते इच्छुक आहेत. अशातच निष्ठावंताला पक्षाने संधी द्यावी. अशी मागणी जुन्या जाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form