चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आढीव येथे रक्तदान शिबीर...


पंढरपूर प्रतिनिधी --
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुका व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काळे यांच्या वाढदिवसा
निमित्त कल्याणराव काळे स्नेह परिवार व आढिव ग्रामस्थ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.. या रक्तदान शिबिरामध्ये 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. 

कल्याणराव काळे यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी कोणताही डामडोल न करता त्यांचे कार्यकर्ते अगदी साध्या पद्धतीने साजरा करत असतात. रक्तदान, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून काळे यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याच पद्धतीने आताचा त्यांचा ५१ वा वाढदिवसही वेगवेगळया सामाजिक उपक्रमातून साजरा केला आहे.वायफट खर्च न करता त्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, यासाठी काळे त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून साजरा केला जातो.म्हणूनच आढीव गावातील लोकांनी रक्तदान करून काळे यांना रक्तदानरूपी शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form