पंढरपूरात एसटी आरक्षण अमंलबजावणी साठी आमरण उपोषणाला सुरुवात
पंढरपूर प्रतिनिधी--
राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार एसटी आरक्षण असून त्यांची तात्काळ अमंलबजावणी करा अन्यथा येणाऱ्या विधानसभेला सत्तेच्या खुर्चीवरून पाय उतार करणार असा निर्वानिचा इशारा देत पंढरपूरात पाच जणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
मागील ७० वर्षा पासून धनगर समाज सनदशीर मार्गाने आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत आहे. परंतु प्रत्येक सरकारने आश्वासना पलिकडे काही दिले नाही. म्हणून धनगर जमाती मध्ये असंतोष पसरलेला आहे. विद्यमान राज्य सरकार ने आता तरी तात्काळ आरक्षण अंमलबजावणीचा जी आर काढावा या साठी राज्यव्यापी आमरण उपोषण करण्यात येत आहे. या उपोषण आंदोलनात मुंबई, पुणे,नागपूर ,धुळे,छत्रपती संभाजीनगर,सांगली,सातारा, अकोला, अहिल्या नगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यातून समाज बांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री जिल्ह्यात काळे झेंडे दाखविणार.
पुढील दोन दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर शहरात येणार आहेत. त्यांनी येताना एसटी आरक्षण अमंलबजावणी करण्याचा आदेश घेऊन यावे अन्यथा त्यांना रस्त्यावर उतरून काळेझेंडे दाखविणार असल्याची घोषणा सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
गावोगावी होणार पाठिंबा आंदोलन
राज्यातील प्रत्येक गावात पंढरपूर येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने करण्यात येणार आहेत. यामध्ये गावागावात उपोषण, रास्तारोको सह अनेक आदोलनाच्या माध्यमातून पाठिंबा देणार आहेत..
Tags
सामाजिक वार्ता