नैसर्गिक आपत्तींकडे दुर्लक्ष केल्यास मानवी सभ्यतेचा अंतिम विनाश होऊ शकतो -- बी.के.महेश भाई


संग्रामनगर दि.२५ (संजय लोहकरे यांजकडून)
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज,अकलूज नाॅलेज सिटी अकलूज येथे पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान कार्यक्रम संपन्न.
         आजकाल आपण वेळोवेळी निसर्गाचा क्रूर चेहरा पाहतो,त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे जीवनाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.पर्यावरण प्रदूषणामुळे आज आम्लयुक्त पाऊस,ग्रीन हाऊस इफेक्ट, ओझोन थराला पडलेली छिद्रे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिग, हवामनात बदल,ध्रुवीय बर्फ वितळणे इत्यादी निसर्गाचे बेफिकीर शोषण,पूर,दुष्काळ, चक्रीय वादळ,भूकंप,त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपतींना कारणीभूत ठरत आहे.जर याकडे दुर्लक्ष केले गेले तर यामुळे जगभरात आर्थिक आणि राजकीय अस्थिरता शिवाय प्राकुर्तिक संकट येऊ शकते आणि मानवी सभ्यतेचा अंतिम विनाश होऊ शकतो.असे मत बी. के अस्मिता बहन,माऊंट आबू (राजस्थान) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकृती,पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान कार्यक्रमात व्यक्त केले.        
        
 या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य डॉ.साठे सर होते. यावेळी प्रमुख पाहुणे बी.के. तुकाराम म्हस्के जिल्हा समन्वय अधिकारी सोलापूर यांनी अभियानाचा उद्देश्य सांगितले तसेच शिवराञी बहन,संचालिका शिवालय सेंटर अकलूज यांनी सर्वांचे मेडीटेशन करुन घेतले.सर्व विद्यार्थी मिञ मैञिणींनी झाडे लावुन झाडे जगवण्याचा दृढ़संकल्प करून प्रतिज्ञा केली यानंतर समाजात पर्यावरण संवर्धन जागृती करावी या उद्देशाने स्माईल एफ.एम.रेडिओ अकलूजचे डायरेक्टर शंकरराव बागडे यांच्याशी सुसंवाद साधून बी.के.अस्मिता (राजस्थान) यांनी मत व्यक्त केले.
           
 प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिवालय संग्रामनगर अकलूज याठिकाणी  विशेष मोटीवेशनल,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थरावर आध्यात्मिक कार्य करणारे ब्र कु पियुषभाई (दिल्ली) यांनी सांगितले आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या मनावर,शरीरावर, पर्यावरणवर होते सकारात्मक विचार करणे काळाची गरज आहे आणि खुश रहाणे आनंदी रहाणे यावे स्रोत आहे ईश्वरीय ज्ञान आणि ध्यानधारणा आवश्यक आहे संगठीत मेडीटेशनचा अभ्यास केला याप्रसंगी शंकरराव बागडे,एस.ए.भोसले साहेब कृषि मंडल अधिकारी खुडूस,व्ही.ए. एकतपूरे कृषि मंडल अधिकारी, पिलीव,बालकलाकार कु.धैर्या अहिल्यादेवी चित्रपट फेम तसेच अकलूज ब्रह्माकुमारीज परिवार,नातेपुते,
वेळापूर, खुडुस,इंदापूर,पिलिव माळशिरस,टेंभुर्णी, इत्यादी ठिकाणचे अनेकानेक परिवराने लाभ घेतला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.ब्र कु.शिवराञी दिदी संचालिका, शिवालय सेंटर अकलूज यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form