रोपळेत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

 हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रचिती...... 
 मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मुस्लिम समाज बांधवांबरोबरच हिंदू समाजबांधवही मोठ्या संख्येने सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. यामुळे येथील हिंदू मुस्लिम एकतेची प्रचिती पुन्हा एकदा आली
पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे मुस्लिम समाज बांधव व टिपू सुलतान ग्रुपच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष रफिक मुलाणी यांच्या संकल्पनेतून मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  
  या कार्यक्रमासाठी धाराशिव शुगरचे संचालक अभिजीत कदम, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, विठ्ठलचे संचालक जनक भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील,  शिवसेना युवा तालुकाप्रमुख महादेव भोसले,  लहुजी शक्ती सेनेचे देविदास कसबे, समाधान वायदंडे, नगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन धनंजय वाघमारे, उपसरपंच विलास भोसले, सिद्धेश्वर भोसले,  डॉ.हनुमंत खपाले, पोलीस नाईक स्वप्निल वाडदेकर,  इरफान शेख, यांच्यासह मुस्लिम समाज बांधव, टिपू सुलतान ग्रुप चे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.  यावेळी मौलाना शहाजहान शेख यांनी समाजास प्रबोधन केले. 
    या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तर समाजातील गरजवंतांसाठी भविष्य काळामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष रफिक मुलाणी यांनी सांगितले. 


.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form