कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिंदी काव्यवाचन स्पर्धा संपन्न.


कोल्हापूर दि.१६
 (केदार लोहकरे यांजकडून)
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात (बी.एड.कॉलेज)  हिंदी दिवस सप्ताहाच्या निमित्ताने हिंदी भाषेतील स्वरचित काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये भिवाजी शंकर कांबळे या विद्यार्थी- शिक्षकाने प्रथम क्रमांक पटकावला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोडोली येथील अध्यापक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मोहन राबाडे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.एस.डी.रक्ताडे होते.प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            वरील उपस्थितांच्या हस्ते विजेत्या कवींना प्रमाणपत्रे देण्यात आली.याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात याप्रसंगी आम्रवृक्षांची लागवड करण्यात आली.
           या काव्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक शीघ्र कवी इम्रान जमादार यांनी पटकावला.तृतीय क्रमांक पूजा विजय चव्हाण- पाटील व प्रांजली दत्तात्रय साळुंखे या दोघींना विभागून देण्यात आला.
        भाषा व साहित्य माणसांना सर्व क्षेत्रांत उभे करण्याचे काम करते.असे प्रमुख पाहुणे मोहन राबाडे म्हणाले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.एस.डी.रक्ताडे म्हणाले की, इंग्रजी भाषा बोलणारा हुशार असतो हा समाजाचा गैरसमज आहे. इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीचा तो प्रभाव आहे.प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी हिंदी बोलताना मराठी शब्द आले तर लोक हसतात मात्र हिंदी बोलण्यात इंग्रजी शब्द आल्यास लोक त्याचे कौतुक करतात. अशाने हिंदी भाषा समृद्ध कशी होणार.असा सवाल त्यांनी उपस्थित केला.काव्यवाचन स्पर्धेच्या  परीक्षण प्राध्यापिका गुलनास मुजावर आणि प्रा.संजय जाधव यांनी केले.यावेळी श्रीमती मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले.
        या कार्यक्रमाचे अंकिता देशमुख यांनी प्रास्तविक केले. पूजा बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले.ऋतुजा राजेंद्र चोपडे यांनी आभार मानले.यावेळी प्रा.अजित लोकरे,कार्यालीन अधीक्षक एस. के.पाटील उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.सृजनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास विभाग आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form