वंदे मातरम् सामाजिक संस्थेचे सहकार्य
पंढरपूर प्रतिनिधी:--
वंदे मातरम सामाजिक संस्था पेनुर व भाग्यश्री हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने,
शिवानंद क्लिनिक पेनूर येथे भव्य मोफत स्त्रीरोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी समाधान गायकवाड यांनी रक्तदान शिबिरात एच.बी कमी असल्याने रक्तदान न करता महिलांना माघारी पाठवण्यात आले, त्यासाठी त्यांना मोफत गोळ्या देण्यात यावे व त्याचबरोबर गावातील सर्व स्त्रियांच्या इतरही समस्या तपासणे यासाठी डॉ.भाग्यश्री स्वामी यांनी पुढाकार घेऊन उपस्थिती दर्शवली व मार्गदर्शन केले,सदर शिबिरात 75 महिलांच्या विविध समस्यांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आला. सदर शिबिराचे सांगता भाग्यश्री हॉस्पिटल पंढरपूर चे प्रमुख डॉ.भाग्यश्री मॅडम यांचा सत्कार संस्थेचे सन्मान चिन्ह देऊन व एक रोप देऊन करण्यात आला.
सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर स्वामी मॅडम यांनी सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे मत व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवानंद क्लिनिक पेनूर चे डॉ.शुभम स्वामी व डॉ.पूजा भोसले-स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सौ.स्नेहल गायकवाड,मनीषा गवळी,रिना कसबे, सविता स्वामी,सज्जन गवळी,किशोर गवळी,दत्तात्रय शेंबडे,पंढरी शेंबडे,प्रथमेश सातव इत्यादींनी शिबिर यशस्वी पाडण्यासाठी प्रयत्न केले.
Tags
सामाजिक वार्ता