मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नामांतर नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार रेल्वे टर्मिनस असा नामकरण सोहळा व्हावा...

नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट जयंतिनिमित्त -- सकल भारतीय सोनार समाज संघटनेची मागणी 
 
 नाशिक (प्रतिनिधी) -
 इ.स. २०२० मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यपूर्व भारताचे वादातीत द्रष्टा विकासपुरुष, *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट* यांच्या आगामी जयंतिदिनी *मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस* चे नामांतर *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार रेल्वे टर्मिनस* विशेष सोहळ्यात शासकीय इतमामाने करण्यात यावे, अशी मागणी *नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान, मुंबई*, *सकल भारतीय सोनार समाज संघटन* आणि *सेतुबंधन* मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

 केवळ स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानचेच वादातीत द्रष्टा विकासपुरुष नव्हेत, तर आशियाई रेल्वेचे शिल्पकार, द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ, द्रष्टा समाजसुधारक *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार* यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे, अशी मागणी मागील महाराष्ट्र सरकारने मंजूर करून तसा शिफारसवजा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे.

सदर प्रस्ताव केंद्र सरकारने लवकरात लवकर मान्य करून नानांच्या येत्या जयंतीदिनी *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार रेल्वे टर्मिनस* असा नामांतर सोहळा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.

*नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार रेल्वे टर्मिनस* चे मागणीसंदर्भात सर्व शाखीय सोनार, सुवर्णकार, सुनार, स्वर्णकार संस्था, संघटना यांच्यासह विविध ओबीसी संघटना, सामाजिक संघटनांनी ३० जुलैपर्यंत केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाला निवेदन द्यावे, असे आवाहन *सकल  भारतीय सोनार समाज संघटन* आणि *सेतुबंधन* मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी केली आहे!

 द्रष्टा समाजसुधारक, द्रष्टा *औद्योगिक विकासक, द्रष्टा  शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानचे द्रष्टा वादातीत विकासपुरुष, आशियायी रेल्वेचे शिल्पकार *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट* यांचे नाव *मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे, या प्रलंबित मागणीचा पाठपुरावा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करणे ही केवळ *नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान मुंबई*, *सकल भारतीय सोनार समाज संघटन* आणि *सेतुबंधन* मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटनांचीच जबाबदारी नाही, तर संपूर्ण भारतातील विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी संघटना, नॅशनल रेल मजदूर महासंघ, तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वांचीही जबाबदारी आहे. 

नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येस म्हणजे दिनांक ३० जुलै २०२४ रोजी सायंकाळपर्यंत *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार रेल्वे टर्मिनस* या नामांतराची मागणी मंजूर झाल्याचा अध्यादेश केंद्र सरकारने काढावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form