स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर तालुका कार्यकारिणी सोलापूर जिल्हा...

पंढरपूर येथील पोलीस बांधवांना २००० मास्क,१५०० इनर्जी पावडर,इमर्जनसी औषधे व मेडीकल साहीत्य वाटप...

पंढरपूर प्रतिनिधी--
आषाढी एकादशी वारीचे औचित्य साधून आज पंढरपूर तालुका कार्यकारिणीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख धनश्रीताई उत्पात यांच्या मार्गदर्शना खाली व सोलापुर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,पोलीस निरीक्षक घोडके यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील पोलीस बांधवांना २००० मास्क,१५०० इनर्जी पावडर,इमर्जनसी औषधे व मेडीकल साहीत्य वाटप करण्यात आले.
तसेच वारकरी बंधू भगिनींना पाणी वाटप सोलापूर जिल्हाध्यक्ष दिनेशजी काटकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष कैलास कारंडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे, पंढरपूर तालुका महिलाध्यक्षा शोभा बडवे, भाळवणकर सर, चव्हाण सर, कु ऋतुजा उत्पात, वाघमारे सर, मुजावर सर व सर्व पंढरपूर पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर तालुका कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form