पंढरपूर प्रतिनिधी--
कोर्टी येथील संत सावता माळी ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजाराम वाघमारे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सत्कार प्रसंगी नूतन चेअरमन राजाराम वाघमारे यांनी म्हणाले की पतसंस्थेची आर्थिक बाजू भक्कम करून सभासद व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ व पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवून एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळवून देऊ असे अभिवचन त्यांनी दिले.
यावेळी निवडीत श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कारखान्याचे संचालक भैर माळी, विठ्ठलचे माजी संचालक धोंडीबा वाघमारे, माझी चेअरमन रघुनाथ वाघमारे, नूतन संचालक मुरलीधर हाके,दादा वाघमारे भैरू वाघमारे, युवा नेते अमोल दहिवडकर, संजय वाघमारे भाऊसाहेब टोपे, ज्ञानेश्वर होनमाने, तसेच माळी टोपे वाघमारे समाजातील सर्व बांधव व नूतन संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणूक निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण व आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
Tags
सामाजिक वार्ता