पंढरपूर ( प्रतिनिधी) --
पंढरपूर तहसील मध्ये कार्यरत असलेले गजानन माने यांची कन्या कु. कार्तिकी गजानन माने ही विद्यार्थिनी बारामती येथील शारदाबाई पवार या महाविद्यालयांमध्ये शिकत असून तिने एम.एच.टी.सी.ई.टी. या परीक्षेमध्ये 92.20% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे. कु. कार्तिकी माने हिचे कौतुक सर्वत्र होत आहे.
कार्तिकी माने मिळवलेल्या यशाबद्दल विचारले असता माझ्या यशाला माझे शिक्षक वर्ग व माझे आई-वडील यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे मी हे यश संपादन करू शकले. असे वक्तव्य कार्तिकी माने या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्तिकी गजानन माने तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक सर्वत्र होत असून त्याचप्रमाणे तिचे पालक गजानन माने ,महेश माने शिक्षक वर्ग यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता