पंढरपुर प्रतिनिधी--
३ जून जागतिक सायकल दिन व ५ जून जागतिक पर्यावरण दिन तसेच पंढरपूर सायकलर्स क्लब ६ वा वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन याप्रसंगी सायकल विरांचा व पर्यावरण रक्षक सायकल मित्र यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर कार्यक्रम आज दि. २/६/२०२४ वार रविवार सायं. ६.०० वाजता स्थळ हुतात्मा स्मारक, जिजामाता उद्यान, छत्रपती शिवाजी चौक, पंढरपूर येथे आयोजित केला असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. उमेश मालक परिचारक संस्थापक अध्यक्ष, सायकल्स क्लब, पंढरपूर हे असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती मा.श्री. प्रशांत खलिपे खजिनदार, सोलापूर केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष, पंढरपूर केमिस्ट ड्रगिस्टअसोसिएशन मा.श्री. विश्वंभर गणपतराव पाटील
जिल्हाध्यक्ष, कर सल्लागार संघटना, सोलापूर,मा.श्री. जहूर मस्जीद खतीब प्रोप्रायटर, एस.टी. खतीब अँण्ड सन्स,
मा.श्री. शाम प्रभू गोगांव सर संचालक, मर्चेंट को. ऑप. बँक लि. पंढरपूर,मा.श्री. पुंडलिक जाधव,व्यवस्थापक, पु. ना. गाडगीळ, शाखा पंढरपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.तरी सर्वानी कार्यक्रमास आवार्जुन उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळविली आहे.
Tags
सामाजिक व्रार्ता