कोळेकर महास्वामीजी म्हणजे शिवाचा अवतार -- म्हैशाळकर महास्वामीजी
नाझरे प्रतिनिधी--
*आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे*
*गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरतील पाप*
कोळेकर महास्वामीनी अनुष्ठानाच्या माध्यमातून देव दाखविल्याचे काम केले व जीवाचा शिव, नराचा नारायण करणारे 24 कॅरेट सोने होते. तसेच बाप रडतो तेव्हा वारसदार गेला समजावे, सौभाग्यवती रडते तेव्हा सौभाग्य गेले समजावे, पुत्र रडतो तेव्हा छत्र हरपले समजावे, बहिण रडते तेव्हा राखी पौर्णिमा आठवूण भाऊ गेला समजावे आणि आज कोळेकर महास्वामीजी लिंगेकय झाल्यामुळे सर्व समाजाच रडत आहे त्यामुळे प्रत्यक्ष कोळेकर महास्वामीजी म्हणजे शिवाचा अवतारच होते व आज त्यांचे उत्तराधिकारी रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांना सर्वांनी तन, मन व धनाने मदत करा म्हणजे खऱ्या अर्थाने लिंगेकय कोळेकर महास्वामीजींचे दर्शन तुम्हास उत्तराधिकारी मध्ये होईल असे श्री श्री 108 म्हैशाळकर शिवाचार्य महास्वामी यांनी कोळे मठात ता. सांगोला, महास्वामींच्या शिवगणाराधना विधीप्रसंगी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी श्री श्री श्री 108 धर्म रत्न गुरुलिंग शिवाचार्य चिटगुपा महास्वामीजी यांच्या पादुकात्वाखाली शिवगनाराधना विधी संपन्न झाला.
सुरुवातीस पाटी श्री चा अभिषेक, शिवाचार्य यांचे इष्टलिंग पूजन, महाआरती व असंख्य शिवभक्तांनी रुद्राभिषेक मध्ये सहभाग नोंदविला व वैदिक विधी सोहळा संपन्न झाला. तसेच महाराज आपल्यातच आहेत असे समजून स्मरण करत राहावे असे राय पाटणकर महास्वामीजी यांनी यावेळी सांगितले. तर गुरुची आठवण प्रत्येकास दररोज होणार असे कोरे महाराज यांनी सांगितले. तर ठेच लागली तर बा पाठवतो त्याप्रमाणे तुम्ही सुख व दुःखात कोळेकर महास्वामींची आठवण करा असे परांडकर शिवाचार्य महास्वामीजी बार्शी यांनी आशीर्वाचनात सांगितले. शिव दीक्षा देण्याचे मोठे काम कोळेकर महास्वामिनी केले व खऱ्या अर्थाने ते भक्ताचे तारणहार होते व ज्ञानी होते असे शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी यांनी सांगितले. व गुरुसाठी तन-मन-धन द्या व ज्या ज्या वेळी तुम्ही गुरूचा धावा करताल त्या त्या वेळी गुरु येऊन तुम्हास मदत करणार असे म्हासोळीकर महास्वामीजी यांनी सांगितले. तसेच सर्व भक्तांच्या इच्छा, आकांशा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील परंतु कोळे गुरू गादीस सर्वांनी सहकार्य करावे असे 31 वे उत्तराधिकारी रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांनी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी गुरूचा जयजयकार करण्यात आला.
गुरु कधीही मरत नाहीत, संस्कार रूपाने ते अमर असतात. मृत्यूला पराजित करण्याची क्षमता गुरु मध्ये असते व अनेक दुःखी जणांना कोळेकर महाराजांचा सहवास लाभला त्यांचा उद्धार झाला व आजही ते इस्टलिंग रूपाने आपल्यात आहेत व त्यांचे अस्तित्व उत्तराधिकारी कोळेकर महास्वामींच्या मध्ये पहा व त्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे महादेव महाराज यांनीही यापुढे असे सहकार्य करावे व दसवी खिडकी म्हणजेच कोळेकर महास्वामीजी आहेत *-शिवाचार्य वाईकर महास्वामीजी*
यावेळी शिवाचार्य स्वामीजी माळकवठा, शिवाचार्य वाळवेकर महास्वामीजी, शिवाचार्य स्वामीजी नागणसूर, शिवाचार्य स्वामीजी मैंदर्गी, शिवाचार्य स्वामीजी माढा, चिदानंद स्वामी शास्त्री, चेअरमन महादेव चिवटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मंगेशजी चिवटे, शिवाचार्य मानूरकर स्वामीजी बीड,माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार, इनामदार साहेब निमसोड, नानासो मेनकुदळे, मठाचे पदाधिकारी, महाराष्ट्र, कर्नाटक येथील भक्तगण, वीरशैव समाज बांधव, कोळे ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार रूपालीताई गाढवे यांनी मानले.
Tags
धार्मिक वार्ता