लिंगैक्य गुरुमूर्तीरुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचा शिव गणाराधना विधी

नाझरे प्रतिनिधी--रविराज. शेटे 
आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे, गुरु म्हणजे मायबाप नाम घेता हर तील पाप.
      
 श्री श्री 108 लिंगैक्य गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे मठाधिपती यांचा शिवगणाराधना सोमवार दिनांक 24 जून रोजी गुरु गादी मठ कोळे ता.सांगोला येथे आयोजित केला आहे त्यानिमित्त वैदिक विधी सोहळा संपन्न होणार आहे.

 त्यानिमित्त लिंगैक्य गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचे समाधीस पहाटे ३:३० ते ७:०० लघु रुद्राभिषेक त्यानंतर महाआरती व श्री श्री 108 धर्म रत्न गुरुलिंग शिवाचार्य बृहन मठ चिटगुपा यांचे सकाळी ७:३० ते ८:३० पादुकत्व व सकाळी नऊ ते दहा सर्व शिवाचार्यांचे इष्टलिंग पूजन व महाप्रसाद तसेच सकाळी १०:३०ते ११:१५ आशीर्वचन आणि दुपारी 12 ते 4 महाप्रसाद वाटप होणार आहे.
       सदर प्रसंगी उपस्थित शिवाचार्यांमध्ये श्री श्री 108 धर्म रत्न गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी चिटगुपा, श्री श्री 108 म्हैसाळकर शिवाचार्य स्वामीजी म्हैसाळ, श्री श्री 108 पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकवठा, श्री श्री श्री 108 म्हासोळीकर शिवाचार्य स्वामीजी म्हासोली, श्री श्री श्री108 शिवानंद शिवाचार्य स्वामीजी वाळवेकर, श्री श्री 108 श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागणसूर, श्री श्री 108 सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी मैदर्गी, श्री श्री 108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर महाराज वेळापूर, श्री श्री 108 माढेकर शिवाचार्य स्वामीजी माढा, श्री श्री 108 मानूरकर शिवाचार्य स्वामीजी मानूर बीड, श्री श्री 108 परांडकर शिवाचार्य स्वामीजी बार्शी, श्री श्री 108 महादेव शिवाचार्य स्वामीजी वाईकर यांच्या सानिध्यात होणार आहे तरी भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन उत्तराधिकारी श्री श्री 108 गुरुमुर्ती गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी, श्री श्री महादेव महाराज रुद्र पशुपती लिंगायत मठ संस्थान, वीरशैव लिंगायत समाज, आणि कोळे ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form