सरकोली प्रतिनिधी--
शेतकऱ्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज वेळेच भरले तरच सहकारी स्वतःची संस्था टिकतील असे मत बँक इन्स्पेक्टर बी व्ही झांबरे यांनी सरकोली येथील सेवानिवृत्त सेक्रेटरी यांचा सत्कार प्रसंगी व्यक्त केले, सरकारी तालुका पंढरपूर येथे सेवानिवृत्त सेक्रेटरी अंकुश शिंदे, बाळासाहेब बुधनेर आधी सेक्रेटरी सेवा निवृत्ती झाली याबद्दल सत्कार व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बँक इन्स्पेक्टर झांबरे यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी नवनाथ पाटोळे यांनी केले, यावेळी उपसरपंच भास्कर भोसले सोसायटीचे चेअरमन हनुमंत भोसले रामहरी भोसले अजित भोसले अरुण घोडके शंकर भोसले प्रतिभा भोसले चाप मॅनेजर गोरख भाई सेक्रेटरी हनुमंत काळे समाधान भोसले यांच्यावर शेतकरी सभासद उपस्थित होते
Tags
सहकार वार्ता