जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
उदगीर प्रतिनिधी (बालाजी सुवर्णकार)
उदगीर येथील एम. एस. पी. मंडळ द्वारा संचलित असलेल्य. राजर्षी शाहू विद्यालय, उदगीर येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या गेट पासून
छत्रपती आणि एक पथक सामाजिक बांधिलकी शाहू महाराजांचे संदेश देणारे स्काऊट गाईड पथक त्यानंतर वृक्षारोपण दिंडी ग्रंथ दिंडी महाराजांच्या विचारांची अनेक बॅनर व शाळेतील पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी यांच्या पथकासह सामाजिक संदेश देणारी दिंडी काढण्यात आली.ही दिंडी शाहू चौकात प्रथमता आणण्यात आली आणि त्यानंतर ऐतिहासिक वारसा असलेल्या उदगीर शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व तसेच मराठा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या राजर्षी शाहू विद्यालय उदगीर व विश्वनाथराव चलवा विद्यालय सर्व कर्मचारी विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होऊन शाहू महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन करून मानवंदना दिली व पूजन करून शाहू चौकात वारकरी संप्रदायाच्या पथकाने संतांचा संदेश त्या सोबतच राहून चौकात महाराष्ट्र गीत,संतांचे अभंग, व संतांच्या विचाराची जाणीव करून दिली. त्यानंतर रॅली राजर्षी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॅप्टन प्राचार्य चंद्रसेन मोहिते सर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री बाबुरावजी नवटक्के सर ऋषिकेशजी जाधव सर कांतरावजी रोडगे सर गोविंदरावजी निटुरे सर तसेच आवर्जून उपस्थित असलेले सामाजिक न्याय दिनाची दिनानिमित्त निवृत्ती न्यायमूर्ती राजेंद्र मुळे साहेब उपस्थित होते.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचाही पालकासह गौरव करण्यात आला. आज समाजाला शाहू महाराजांच्या विचाराची आचारांची आणि एक समतेचा संदेश देणारा राजा यांची गरज सर्वांनी जोपासावी सामाजिक जाणीव ठेवावी असा संदेश अनेक उपक्रम घेऊन समाजाला आणि विद्यार्थ्यांना देण्यात आला त्याच वृक्ष दिंडी वृक्ष लागवड यातून नैसर्गिक संपन्नता याचा संदेश देण्यात आला.वारकरी पथकातून संतांच्या विचाराचं सामाजिक गरज सांगण्यात आली त्यासोबतच रक्तदान शिबिर आयोजित करून शेकडोंच्या संख्येने शाळेतील कर्मचारी पालक आणि समाज प्रेमींनी रक्तदान करून योगदान दिले. त्याप्रसंगी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदसिद्ध पदाधिकारी शाळेतील सर्व कर्मचारी नागपां अबरखाने ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित राहून सहकार्य केले या कार्यक्रमाचे संचालन बिरादार एस. ए सरांनी केले व सर्वांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय कल्याणे एस.टी सरांनी मांडले व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags
सामाजिक वार्ता