६५० शालेय विद्यार्थ्यांना तब्बल चार हजारहून अधिक वह्यांचे मोफत वाटप डॉक्टर दांम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

तुंगत (प्रतिनिधी):-- 
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे तसेच आर्थिक परिस्थिती अभावी कोणतीही अडचण येऊ नये हा उदात्त हेतू ठेवून पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील डॉक्टर दांपत्याने गावामध्ये असलेल्या अंगणवाडी सह जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील तब्बल 650 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तब्बल चार हजारहून अधिक मोफत शालेय वह्यांचे वाटप करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
तुंगत गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे आणि त्यांची पती डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी स्वखर्चातून गावात असणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमधून व त्यांच्या पालकांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहे. येथील भोसले वस्ती जि.प. शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत तसेच तुंगेश्वर माध्यमिक प्रशाले मधील तब्बल 650 हून अधिक विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या वह्या वाटप यावेळी करण्यात आले.
ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरपंच डाॅ. अमृता रणदिवे यांच्या सामाजिक संकल्पनेतून हे वह्या वाटप करण्यात आले आहे. गावातील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी दरवर्षी तुंगत याठिकाणी शालेय विद्यार्थांसाठी डॉक्टर दाम्पत्याचे वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये शालेय साहित्यासह सायकल वाटप, वृक्षारोपण, तसेच गुणवंत विद्यार्थांचे खाजगी क्लासेसची फी त्यांनी स्वत: भरण्याचा उपक्रम राबविला आहे.
या वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश रणदिवे, सदस्य पंकज लामकाने, सुधीर आंध, नारायण रणदिवे, नवनाथ रणदिवे,  शिवाजी इंगळे, विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल रणदिवे, कॅप्टन इंद्रजीत रणदिवे, धनाजी मोरे, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वामन वनसाळे, फय्याज मुलाणी, सचिन डिकरे, ज्योती बनसोडे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form