नाझरे प्रतिनिधी--
वाढेगाव ता. सांगोला येथील रहिवाशी व मानगंगा भ्रमण संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ काका घोंगडे यांना वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
वैजिनाथ काका घोंगडे यांनी मानगंगा संस्थेच्या वतीने सोलापूर व सांगली जिल्ह्यातील मानगंगा नदीवर केलेल्या कामाची नोंद घेऊन जलसंधारण चे काम उत्कृष्ट केले त्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 111 व्या जन्मदिनानिमित्त सोमवार एक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे, तसेच राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन घोंगडे यांना यशवंतराव चव्हाण केंद्र मंत्रालयाजवळ मुंबई या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे. सदरचा सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने वैजनाथ काका घोंगडे यांचे अनेक संस्था, पदाधिकारी, व्यक्तिगत अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.
Tags
सामाजिक वार्ता