राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर प्रतिनिधी-- 
 राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
  
  याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार , मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे,  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मंदिर समितीची व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली  सुरू असून, सदर कामाची पाहणी राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी केली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form