दिल्लीत यश मिळालेल्या खेळाडूंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उद्योग व व्यापार प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचेकडून सन्मान
पंढरपूर प्रतिनीधी--
पंढरपूर दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पंढरीतील दिव्या स्पोर्ट्स क्लब मधील विद्यार्थिनींनी मोठे यश संपादन केले आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे नागेशदादा फाटे यांनी यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान केला आहे.
भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेल्या या तायक्वांदो कराटे स्पर्धेमधून पंढरीतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण ११ मेडल पटकाविले आहेत. त्यामधे ४गोल्ड मेडल आणि ७ ब्रांज मेडलचा समावेश आहे.
या यशस्वी खेळाडू मधून समृध्दी कवडे, प्रांजली वाघमारे, शर्वरी सावळे, सिया सतपाल या विद्यार्थिनीचा समावेश होता. त्यामुळे दिव्या स्पोर्ट्सचे महेश गावडे सर यांचेसह वरील विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. यावेळी, मा. एस एस चट्टे सर, मा. शुशांत बागल, मा. विनय शिंदे मा. संग्राम कापसे साहेब, मा. संतोष पुणेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
क्रीडा वार्ता