देशाला हुकुमशाहीतून बाजूला करण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा-- आदित्य ठाकरे

नाशिक महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांच्या प्रचार बैठकीत आदित्य ठाकरे यांचे आवाहन
राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचीही उपस्थिती

पंढरपूर प्रतिनीधी--
देशाच्या व राज्याच्या विकासासाठी जनतेने महाविकास आघाडीलाच साथ देण्यासाठी पावले उचलणे काळाची गरज आहे. देशाला हुकुमशाही व महागाईच्या विळख्यात अजूनही अडकून न देण्यासाठी मतदानाद्वारे त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण व वातावरणीय बदल व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या  बैठकीत ठाकरे बोलत होते.

ऑडिटोरियम हाॅल, सातपूर, नाशिक येथे झालेल्या इंडस्ट्रियल फ्रॅटिरनिटी च्या 'गेट टू गेदर' या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वरील आवाहन केले. 

यावेळी पंढरपूर तालुक्यातील सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश एकनाथ फाटे यांनी यावेळी आवर्जून उपस्थिती दर्शवित आपले विचार व्यक्त केले. यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भरघोस मताधिक्य मिळवू निवडणूक येतील असा विश्वासही फाटे यांनी व्यक्त केला आहे.
      भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविण्याची योग्य वेळ आली असून, त्यासाठी आपण सर्वांनीच एकत्र येत काम केले पाहिजे. असा सल्लाही यावेळी आ.नितीन भोसले यांनी दिला.
        यावेळी आयोजित कार्यक्रमास दिंडोरी लोकसभा प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,सुधाकर बडगुजर जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाठा, मा.राजेश वैश्य  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,रमेशजी वैश्य (चेअरमन NICE, मा. अध्यक्ष NIMA,जे. एम. पवार (मा.अध्यक्ष NIMA / AIMA),मधुकर ब्राम्हणकर अध्यक्ष, NIMA,विवेक पाटील गडाख (मा.अध्यक्ष, AIMA),मा.संतोषजी मंडलेचा (मा.अध्यक्ष महाराष्ट्र चैंबर ऑफ़ कॉमर्स),ज्ञानेश्वर गोपाले (मा.अध्यक्ष, AIMA, IPP AIMA),मंगेश पाटणकर  (मा.अध्यक्ष, NIMA), ललितजी बुब (अध्यक्ष, AIMA),राजेंद्रजी पानसरे (उपाध्यक्ष, AIMA),मनिष रावल (सहसचिव- NIMA),श्रीकांत बच्छाव (मा. जनरल सेक्रेटरी, NIMA),राजेश सूर्यभान गडाख (संचालक, NIMA), नंदकुमार पाटील (उद्योजक),दिलीप वाघ (उद्योजक), विनायकजी मोरे (उद्योजक),यांसह अनेक मान्यवर उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form