पंढरपूर प्रतिनीधी--
स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांती मंदिरात सावरकर प्रेमी मंडळ व सावरकर मुक्तद्वार वाचनालय यांचे वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक २६ ते २८ मे २०२४ अखेर सायंकाळी ठीक ६.३० वाजता करण्यात आले आहे.
तर दिनांक २६ रोजी सतीश भिडे गुजरात यांचे सावरकरांचे गीतमय चरित्र या विषयावर, दिनांक २७ रोजी प्रताप चव्हाण यांचे आजचा सामाजिक भारत व स्वामी विवेकानंदांचे विचार या विषयावर, दिनांक २८ रोजी काशिनाथ देवधर वरिष्ठ शास्त्रज्ञ पुणे यांचे भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी सर्वांनी या व्याख्यान
मालेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर यांनी केले आहे
Tags
सामाजिक वार्ता