पंढरपूर प्रतिनीधी--
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदान भरविले होते. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल करण्यात आली. यामधील पाहिले बक्षीस मोहोळ विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या वतीने देण्यात आले. दोन लाख रुपये रोख आणि एक लाख रुपयाची चांदीची गदा असे पाहिले बक्षीस असून हे उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांना खरे यांचे हस्ते देण्यात आले.
पहिली कुस्ती महेंद्र गायकवाड विरुद्ध बालारफिक शेख यांचेमध्ये झाली होती. यामधून महेंद्र गायकवाड विजयी झाले. दोन लाख रुपयेची दुसरी कुस्ती प्रकाश बनकर विरुद्ध बोला पंजाब यंचेमध्ये झाली.यामधून प्रकाश बनकर विजयी ठरले आहेत. तृतीय कुस्ती समीर शेख विरुद्ध भैरू माने याच्यात बरोबरीवर सोडण्यात आली. चौथी कुस्ती सुरज मगर विरुद्ध हरिदास पवार यांच्यामध्ये झाली.यामधून सुरज मगर विजयी झाले.
या कुस्ती मैदानवेळी प्रमुख उपस्थिती मोहोळ मतदार संघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे, यशवंत भैय्याशिंदे, बाळासाहेब चव्हाण ,पंढरपूर कृषी उत्पन्न समितीचे सदस्य तानाजी पवार, मगरवाडी सरपंच राजेंद्र रेवडकर, विलास बोंबाळे, वनाधिकारी गणेश रंधवे, सोलापूर जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष असलम काझी महाराष्ट्र केसरी केसर सिकंदर शेख ,गंगावेस तालमीचे वस्ताद विश्वास हरगुले, सत्कारमूर्ती व प्रमुख उपस्थिती डॉ. नितीन तोष्णीवाल सोलापूर डॉ. विवेक गुंडेवार डॉ.गिरीश बेणारे ,डॉ. मच्छिंद्र गोरे, डॉ. विजय शिरसागर, डॉ. संग्राम किलमिसे , मच्छिंद्र नकाते, एकनाथ पवार, महादेव पवार सर, भागवत बोंबाळे ,इंद्रजीत शिरसागर, श्री दरलींग वालगी मंडळ मगरवाडी येथील सर्व सभासद, गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे,नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, आंबे येथील माजी सरपंच प्रकाश माळी, बेगमपुरचे सरपंच प्रकाश सपाटे, संजय मस्के, राजेंद्र चंदनशिवे, पांडुरंग डोंगरे, समाधान बाबर, उमाकांत करंडे, यांचेसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता