मोहोळ प्रतिनिधी --
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना काल मोहोळ मध्यवर्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भूतो न भविष्य अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मोहोळ शिवसेना नेते व उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीखाली नारळ फोडून मिरवणुकीस सुरुवात झाली,तत्पुर्वी मोहोळ शहरांमध्ये असलेल्या बुद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्मारकाचे दर्शन घेतले त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मोहोळ शहरातील मंडळांनी राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मिरवणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत जल्लोषात मिरवणूक साजरी करण्यात आली याप्रसंगी हजारो आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर मुख्य मार्गाने मार्गस्थ होत ढोल ताश्यांच्या गजरात तरुणांनी ताल धरला असताना राजू खरे यांनाही मोह न आवरल्याने त्यांनीही तरुणांच्या गर्दीत मिरवणुकीत सहभागी होत गाण्याच्या तालावर ठेका धरला. राजू खरे यांचा निगर्वी स्वभावामुळे ते सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
Tags
सामाजिक वार्ता