कुमठेकर परिवाराकडून विश्वब्राह्मण श्री कालिका देवीस सोन्याचा मुलामा केलेला चांदीचे मुकुट अर्पण...

सदरचा मुकुट मुबंई येथील प्रसिद्ध  कारागीर श्री नाना वेदक यांनी बनविली

सोलापूर प्रतिनिधी --
येथील विश्वब्राम्हण समाज कालिका मंदिर ट्रस्ट, शुक्रवार पेठ सोलापूर येथील पांचाळ सोनार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कालिका देवीला दिनांक १३ एप्रिल रोजी वसंत पंचमीच्या शुभ दिनी तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय  श्री बाळासाहेब रामचंद्र कुमठेकर यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव तथा श्री कालिका देवी मंदिर समितीचे विश्वस्त श्री प्रसाद बाळासाहेब कुमठेकर ,श्री नंदकुमार बाळासाहेब कुमठेकर आणि ओंकार बाळासाहेब कुमठेकर कुटुंबियांकडून चांदीचे सोन्याचा मुलामा केलेला मुकुट अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती प्रसाद कुमठेकर यांनी दिली. 
सदरचा मुकुट मुबंई येथील प्रसिद्ध  कारागीर श्री नाना वेदक यांनी बनविला असून त्यांनी आतापर्यंत मुंबई तील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा, सिद्धिविनायक मंदिर, एकविरा देवी यांचे दागिने  बनविले आहेत.
  
सध्या श्री कालिका देवी उत्सव सुरु असुन मंदिरात दररोज देवीची विविध प्रकारे पुजा, अर्चना, सप्तशती पाठ, कुंकुम अर्चना, नवचंडी होम, रूद्र अभिषेक असा पाच दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या उत्सव प्रसंगी कुमठेकर परिवार यांनी देवीस सुंदर, सुबक, आकर्षक मुकुट अर्पण केल्यामुळे समाजातुन त्याचे कौतुक होत  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form