बारामती लोकसभा मतदारसंघ मनेसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न- दिलीप धोत्रे

बारामती प्रतिनिधी ---
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्राताई अजित दादा पवार यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हा, खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बारामती शहरातील हॉटेल सिटी इन येथे घेण्यात आली.
 
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक दिलीप बापू धोत्रे, राज्य उपाध्यक्ष आणि समन्वयक सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपट सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष शिदवाडकर, जिल्हा संघटक विनोद जावळे, कैलास दांगट तसेच सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उप तालुका अध्यक्ष, उप शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form