तालुक्याच्या चौफेर विकासासाठी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा --- आमदार शहाजी बापू पाटील

नाझरे प्रतिनिधी--(रविराज शेटे)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, अजित दादा पवार यांच्यामुळे सांगोला तालुक्यासाठी भरपूर निधी मिळाला असून, आपण पाणी आणतो म्हटले ते आणले, जळीताचे पैसे आणले व सध्या टेंभूचे पाणी माणनदीत आणले परंतु हे सर्व करीत असताना माढा लोकसभेचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे योगदान असून, यापुढे भविष्य उज्वल करण्यासाठी व सांगोला तालुक्याच्या चौफेरी विकासासाठी कमळ चिन्हावरच बटन दाबून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा असे मत आमदार शाहाजी पाटील यांनी नाझरे ता. सांगोला येथे प्रचार सभेत व्यक्त केले.
          या अगोदर व आताही पाण्याच्या आडवे मोहिते पाटील आहेत त्यामुळे पाणी आपणास मिळणार नाही त्यामुळे त्यांना दूर करा कारण या अगोदर विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडून येऊन सांगोला तालुक्यात काय दिले ते सांगा व मग बोला तर येत्या पाच वर्षा त विकासासाठी नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा असे आव्हान आमदार पाटील यांनी यावेळी केले.
         
 *एकीकडे पाणी आणणारा व एकीकडे पाणी आडवणारा* 
          या अगोदर पाण्यावर अनेक निवडणुका झाल्या परंतु पाणी आले नाही व कोणी किती प्रयत्न केले. याबद्दल आपणास टीका करायची नाही परंतु मान नदीत कोयनेचे पाणी सोडण्यासाठी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे योगदान मोठे आहे व त्यामुळे नदी टेंभूच्या पाण्यामुळे सध्या वाहत आहे तर बारमाही नदी वाहण्यासाठी त्यांनाच विजयी करा असे आवाहन मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी केले. व ज्या ज्या वेळी बापू मुंबईला गेले ते रिकाम्या हातून परत आले नाहीत व कोट्यावधी निधी आणला व आज दुष्काळाचे अनुदान ही सांगोला तालुक्यास मिळाले तर यापुढे मान नदीत पाणी सोडा हे सांगावे लागणार नाही परंतु सध्या एकीकडे पाणी आणणारा व एकीकडे पाणी अडवणारा आहे मग सांगा मतदान कोणाला करायचे यासाठी कमळाची पिठी भरभरून द्या व मोदीच पंतप्रधान करण्यासाठी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा असे आवाहन यावेळी दीपक आबा यांनी केले.
           
सुरुवातीस नंदकुमार रायचूरे व दादासाहेब हरिहर यांनी सर्वांचे स्वागत केले. व भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी होते व त्यावेळी त्यांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी टेंभूचे पाणी मान नदीत कसे येते हे सांगितले व त्यावेळी कृष्णा खोरे स्थापन झाले व टेंभू, मैशाळ, नीरेचे पाणी बापूंनी मंजूर केले व त्यांना साथ देणारे खंबीर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील असल्यामुळे आज टेंभूचे पाणी मान नदीत आले व वर्षातून तीन वेळा हे पाणी येणार आहे व कायमचा उन्हाळा या भागातील संपवायचा असेल तर रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा असे आवाहन शिवसेना नेते दादासो वाघमोडे यांनी यावेळी केले. सदर प्रसंगी उद्योग समूहाचे भाऊसाहेब रुपनर, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार, शिवसेना अध्यक्ष दादासाहेब लवटे, भाजप तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, राष्ट्रवादी प्रवक्ते महादेव कांबळे, राजाभाऊ खरात, सुरेश काका चौगुले, बंडू मामा आदाटे, बसवेश्वर आदाटे, हरिभाऊ पाटील, सुभाष पाटील, भाऊ पाटील, पांडुरंग वाघमारे, दादासो खरात, रशीद काजी, संदीप देशपांडे, विकास वलेकर, मंगेश रायचुरे, शिवाजी बनसोडे, अजय सरगर, मुकुंद पाटील, रमेश पाटील, अण्णासो पाटील, हनुमंत वाघमोडे, तानाजी काटे, राजू पाटील, अशोक पाटील, आनंदा बनसोडे, उत्तम सरगर, संजय कोकरे, ओंकार देशपांडे, सुशांत आईवळे, फिरोज मुलानी, सागर वाघमारे, रोशन भोसले, अक्षय बनसोडे, भैय्या काजी, दादा ननवरे महायुतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नागेश रायचूरे तर आभार नंदू रायचूरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form