पंढरीत सकल मातंग समाजाचा बैठकीत निर्णय...
पंढरपूर प्रतिनीधी--
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत संख्येने मोठ्या असणाऱ्या मातंग समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही. महायुतीकडून अनेक जण इच्छुक असताना या समाजाला न्याय देण्यात आला नाही. यामुळे सत्ताधारी भाजपचा निषेध केला आहे. यावेळी सोलापूर मतदार संघात सकल मातंग समाजाचा स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय पक्का झाला आहे. यामुळे राम सातपुते यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघासह इतर राखीव मतदार संघातून मातंग समाजाचे अनेक उमेदवार इच्छुक होते. त्यातील अनेकांना केवळ नादी लावण्यात आले. यामुळे मातंग समाजातील कोणालाही उमेदवारी मिळाली नाही.
वरील बाब सकल मातंग समाजाला खटकली आहे. यामुळे पंढरीत मातंग समाजातील सर्व प्रतिनीधी यांनी एकत्रित येत. भाजपचा निषेध व्यक्त केला आहे. यामुळे सोलापूर मतदार संघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना अडचण निर्माण होणार आहे.
या बैठकीचे वेळी लहुजी शक्ती सेनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष देविदास कसबे, बहुजन संमता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे,दलीत पँथरचे पपू वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष जयसिंग मस्के, तालुका अध्यक्ष मुकुंद घाडगे, युवक तालुका अध्यक्ष सूरज सकटे, बहुजन समता पार्टीचे समाधान रणदिवे, मसुदेव काळे, संजय वाघमारे, अमोल खिलारे सर,शरद लोखंडे, प्रकाश साठे,विनोद अवघडे सर, समाधान वायदंडे, मल्हारी फाळके, नागेश वाघमारे, आपा वाघमारे, गणेश खंडागळे,संजय कांबळे, दशरथ कसबे, यांचेसह सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता