पंढरपूर अधिवक्ता संघ तर्फे पंढरपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा....

पंढरपूर प्रतिनिधी ---
पंढरपूर अधिवक्ता संघातर्फे दिनांक 23 मार्च रोजी शहा लॉन्स येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आलेले होते. सदर संमेलनामध्ये पंढरपूर ,सांगोला व मंगळवेढा येथील अनेक विधीज्ञ यांनी सहभाग नोंदविला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मा.सलमान आझमी यांचे शुभ हस्ते करण्यात आले. 

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूर एम बी लंबे ,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी चेअरमन मिलिंद थोबडे ,दिवाणी न्यायाधीश पाखले, खंडाळे, बुद्रुक,कामत ,बागुल,पठाडे, सोनवलकर , साळुंखे तसेच मंगळवेढा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड उल्हास माने  हजर होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपुर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड अर्जुन पाटील यांनी केले.सूत्रसंचालन ॲड नेत्रजा पाटील,सचिव ॲड राहुल बोडके व सहसचिव शक्ती माने यांनी केले.सदर कार्यक्रमाचा विधीज्ञा मध्ये उत्साह दिसून आला. कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष ऍड शशिकांत घाडगे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form