डॉ.प्रतापसिंह घाडगे यांची धर्मादाय रुग्णालय सदस्यपदी निवड...

पंढरपूर प्रतिनिधी ---
धर्मादाय रुग्णालयामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे याकरिता समिती काम पाहत असे या समितीवर सदस्य म्हणून पंढरपूर येथील बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ.प्रतापसिंह शिवाजीराव घाडगे यांची सोलापूर जिल्हास्तरीय समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे.
   
बाल आरोग्य सेवेत गेली दहा वर्षे कार्य करणारे डॉ.घाडगे अजनसोंड येथील असून पंढरपूर शहर ग्रामीण भागा मधील बाल  रुग्णांची सेवा करत आहेत.विविध सामाजिक उपक्रमात सहभागी राहून आरोग्य शिबिर आयोजित करून समाज सेवेचे व्रत घेवून कार्य करणारे डॉ घाडगे यांची समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांना विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक त्यांना शुभेच्छा देऊ केल्या आहेत.

यावेळी आदित्य फत्तेपुरकर, डॉ सचिन चव्हाण,डॉ सौ.दीपश्री घाडगे,अजय कदम,
कमलाकर गोटेकर,राहुल साबळे,अर्चना साबळे,डॉ.श्रीकांत  खटावकर हॉस्पिटल स्टाफ, व मित्रमंडळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form