पंढरपूर प्रतिनिधी ---
लोकसभा निवडणूक २०२४ करिता देण्यात येणाऱ्या सुविधांतर्गत राज्यातील सुमारे १,१६,५१८ अंध मतदारांच्या सुलभतेसाठी ब्रेल लिपीतील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.
सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ४०% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व वय वर्षे ८५ वरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना १२-डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध आहे. अशी माहिती यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासह सचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी आदी उपस्थित होते.
Tags
प्रशासन वार्ता