गर्भगृहातील काम वेळेत पूर्ण करावे----
सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
पंढरपूर (ता.22)-
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यातील संवर्धनाचे काम आषाढी यात्रेपूर्वी करण्याचे प्रस्तावित असून, गर्भगृहातील काम पुरातत्व विभागाने व संबधित ठेकेदाराने वेळेत पूर्ण करावे अशा सुचना मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असून या कामांची पाहणी मंदिर समितीचे सदस्य व पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी केली. तसेच मंदिर समिती सदस्य, पुरातत्व विभाग व संबधित ठेकेदार यांच्या समवेत सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी मंदीर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवी निगडे तसेच दुरदुष्य प्रणालीद्वारे श्री. अतुलशास्त्री भगरे गुरूजी, कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, पुरातत्व् विभागाचे सहायक संचालक श्री विलास वाहणे, वास्तुविशारद श्रीमती तेजस्विनी आफळे, बांधकाम विभाग प्रमुख श्री बलभिम पावले, ठेकेदार श्री रमेश यवले उपस्थित होते
यावेळी मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप व इतर ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली .
Tags
प्रशासन वार्ता