कालिका प्रतिष्ठान व विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने...
पंढरपूर प्रतिनिधी --
महिला दिनानिमित्त कालिका प्रतिष्ठान व विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळ महिला आघाडी सोलापूर यांच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त महिलांसाठी सन्मान सोहळा कालिका देवी मंदिर, शुक्रवार पेठ, सोलापूर येथे सदर कार्यक्रम करण्यात येणार आहे.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्रेरणा ज्योती या विशेष सन्माना करण्यात येणार आहे यामध्ये कला, किडा, वैद्यकिय, कायदे सल्ला, आदर्श माता, उद्योजक, आदर्श शिक्षिका,समाजसेविका, कीर्तनकार, आदर्श कन्यारत्न अशा विविध क्षेत्रातून ठसा उमटून वैशिष्ट पुर्ण कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या स्त्री शक्तीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्यासाठी सर्वांना उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता