पंढरपूर प्रतिनिधी --
महिला दिनानिमित्त कालिका प्रतिष्ठान व विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळ महिला आघाडी सोलापूर यांच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रेरणा ज्योती पुरस्कार मान्यंवर मंडळी यांच्या हस्ते देऊन सन्मानित
करण्यात आले.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व युवती याचां सन्मान शैलजा धाराधिवकर, रोहिणी कस्तुरे,कल्याणी महामुनी, उषाताई महामुनी, मंगलाताई दिक्षित यांच्या हस्ते धनश्री महामुनी उद्योजिका, सुनीताताई सोनार समाजसेविका,गीतांजली महामुनी
समाजसेविका, शुभांगी पंडित समाजसेविका,
श्रीमती स्नेहल पारखीआदर्श माता,कु आकांक्षा पोतदार (mpsc) युवतीरत्न,कु साक्षी महामुनी क्रीडा रत्न, संगीताताई पोतदार समाजसेविका,कु सुप्रिया पंडित युवती रत्न,अनिताताई पंडित समाज सेविका,आशा पोतदार समाजसेविका, श्रीमती रोहिणी जडे आदर्श माता, सुप्रिया पंडित आदर्श शिक्षिका, प्रियांका दीक्षित
आदर्श शिक्षिका,कु अर्चना पोतदार युती रत्न यांना प्रेरणा ज्योती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी समाजातील दानशुर उद्योजक सराफ निलेश धाराशिवकर, महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळ राज्य कार्यकारिणी सदस्य समाज सेवक शाम पोतदार, सदस्य सुनिल पंडीत, किशोर पंडीत श्रीनाथ पोतदार, जिल्हा अध्यक्ष मनिषाताई पंडीत, प्रिया धर्माधिकार डॉ.दिपक पोतदार,अक्षय
महामुनी सांगोला तालुका अध्यक्ष आदी मान्यवर मंडळी तसेच महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळ महिला आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता