शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव बाबर यांच्या हस्ते नुतन सरपंच जाधव यांचा सत्कार...

पंढरपूर प्रतिनिधी -- 
भाळवणीचे सरपंच राजकुमार पाटील यांच्या राजीनाम्यानंतर  रणजीत जाधव यांची भाळवणी गावच्या सरपंचपदी निवड झाली.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.

 या निवडणूकी दरम्यान सरपंचपद आपल्या गटाकडेच राहावे यासाठी जोरदार प्रयत्न झाले परंतु दिनांक १९ जानेवारी रोजी  लोकशाही मार्गाने मतदान घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.यासाठी शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर तसेच चंद्रभागेचे संचालक सुनिल पाटील व तिसऱ्या माघाडीचे मुख्य विजय शिंदे यांनी  गावाचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी चांगल्या विचारांचा लोकांची  मुठ बाजून विजय खेचून आणला व रणजीत जाधव यांना सरपंच केले. यावेळी त्यांनी विरोधी गटाचे उमेदवार सुरेखा शिंदे यांचा पराभव केली. 

यावेळी आरपीआय चे सचिन भोसले, धैर्यसिंह नाईक - निंबाळकर, जयराम शिंदे, अमोल लिंगे, भोजलींग बाबर किशोर खरडकर,  निहाल शेख, सागर चौगुले, जावेद शेख दिपक गवळी,ग्रा.प. सदस्य जिगर
गायकवाड,अर्जुन लिंगे सविता लोखंडे यांनी विजय मिळविण्यासाठी विषेश परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form