पंढरपूर प्रतिनिधी ---
मोहोळ मतदारसंघातील नेपतगाव (ता. पंढरपूर) येथील एक गरीब कुटुंबातील तरुणाने कर्जापायी व होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केली. ही बाब शिवसेना नेते व उद्योजक राजू खरे यांना समजली. त्यांनी तत्काळ त्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
आत्महत्या केलेल्या युवकाच्या दोन लहान मुलांच्या भवितव्यासाठी खरे यांनी रोख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करत हातभार लावला आहे. यामुळे राजू खरे यांना जनतेच्या मदतीला धावून येणारा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
मोहोळ मतदारसंघात मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी देत मतदारसंघातील जनतेसाठी जणू काही संकटमोचनच बनले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजू खरे हे चर्चेचा विषय ठरत आहेत. गावखेड्यापर्यंत पोहोचून अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या कुटुंबांची माहिती घेत त्यांना मदत मिळवून दिली जात आहे. त्यामुळे राजू खरे यांची जनतेप्रति वेगळीच क्रेझ निर्माण झाली असून, मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी काम करणारा नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
Tags
राजकीय वार्ता